माणिक साळवे
छत्रपती संभाजीनगर : उद्या होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून शहरात सर्वत्र भरारी पथके सक्रीय करण्यात आली आहेत. तर कोबींग ऑपरेशची तयारीही करण्यात आली आहे. दरम्यान या निवडणुकीत ११ लाख ११८ हजार २२३ मतदार लोकशाहीचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी १३९७ मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. तर शहरातील १३८ संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरात शांतता रहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे यांची नजर ठेवण्यात आली आहे.
स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रे
मतदानानंतर ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व मतमोजणीसाठी शहरात चार स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे:
ींशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा ींशासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्टेशन रोड ींएस. एफ. एस. शाळा, जालना रोड ींगरवारे आयटी पार्क, चिकलठाणा एमआयडीसी
वेबकास्टिंग व निवडणूक निरीक्षण
मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी ५३७ मतदान केंद्रांवर मतदान कक्षाच्या आत व बाहेर वेबकास्टिंग कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय निवडणूक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी १३७ क्षेत्रीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्र व मनुष्यबळ व्यवस्था
शहरातील एकूण१२६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी एकूण ५५८८ मतदान केंद्राध्यक्ष व पोलिंग अधिकारी (पोलिंग ऑफिसर क्रमांक १ ते ३) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदार व उमेदवारांची संख्या विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतदानाचा दिवशी पोलिसांचा मोठा ताफा
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालय तर्फे पोलीस आयुक्तालयाचे एकूण ३३०७ पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १९२८ होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) च्या एकूण एक कंपनी व दोन प्लाटून असे अतिरिक्त मनुष्यबळ देखील तैनात करण्यात आले आहेत.
प्रशासनाचा संदेश
महानगरपालिका प्रशासनातर्फे मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह समन्वय साधण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भेटी गाठीचा सिलसिला सुरू
निवडणुकीचा प्रचार मंगळवारी पाच वाजण्यापासून बंद झाला आहे. पण उमेदवारांना मतदारांच्या भेटी गाठी घेता येतात. पण त्यांना प्रचार करता येत नाही. या काळात अनेक उमेदवार मतदारांना अमिष दाखविण्याचे प्रयत्न करतात. अनेक वॉर्डांत रोख रक्कम देण्यात येते. असे बोलले जात आहे. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळी घडतो. बहुतांश उमेदवार मतदारांना अमिष दाखवित असल्याने तेरी भी चूप या, मेरी भी चूप असा प्रकार घडतो.
निवडणूक ड्युटीसाठी ६३ स्मार्ट सिटी बसेस तैनात
छत्रपती संभाजीनगर: आज १४ जानेवारी रोजी होणार्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, या कामासाठी शहर बस सेवेतील एकूण ६३ बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे उद्या शहरातील नियमित बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














